अखेर त्या जागेवर उभारली पोलीस चौकी अतिक्रमणाचे दार कायम बंद


रिसोड प्रतिनिधी - 

रिसोड रिसोड येथील सेंटर पॉईंट वर असलेल्या शासकीय जागेवर अनेकांचे अतिक्रमणाचे डोळे अखेर मिटले आणि आता त्या जागेवर पोलीस चौकी उभारण्याचे काम पूर्णत्वास होत आहे

रिसोड शहरातील मुख्य चौक असलेल्या वाशिम नाका च्या लगत असलेल्या त्या शासकीय जागेवर अतिक्रमण करण्याकरिता अनेकांचे प्रयत्न होते व ती शासकीय जागा हडप करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू होते शासन स्तरावर तसे प्रयत्न सुद्धा झाले ही बाब लक्षात येतात त्या ठिकाणी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात व कायदा सुव्यवस्था अधिक बळकट करण्याकरिता पोलीस चौकीची संकल्पना ठाणेदार देवेंद्र सिंग ठाकूर यांच्या डोक्यात शिरली आणि त्या जागेवर पोलीस चौकी उभारण्याचे कार्य सुरू झाले आणि अतिक्रमणाच्या मुस्क्या आवळल्या रिसोड ते वाशिम मार्गावरील जवळपास 5000 स्क्वेअर फुट जागाही शासकीय होती पोलीस प्रशासन वतीने जिल्हाधिकारी यांना सतत जागेबाबत पोलीस चौकी उभारण्याकरिता मान्यता प्रस्ताव पाठवण्यात आला होता सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी मंजूर केला असून त्या संबंधित आदेश सुद्धा पारित करण्यात आला आहे अशी माहिती प्राप्त झाले त्या शासकीय जागा काबीज करण्याकरिता अनेकांचे डोळे लागले होते दोन-तीन वेळा त्या जागेवर अतिक्रमण सुद्धा झाले पण प्रशासनाच्या अलर्ट मोड मुळे  ते साध्य होऊ शकले नाही आणि आता पोलीस चौकीची निर्मिती झाल्यामुळे अतिक्रमणाचा प्रश्नच मिटला सदर जागेला कुंपण घेण्यात आले त्या ठिकाणी सिमेंट बाकडे बसण्यासाठी ठेवण्यात आले तसेच त्या ठिकाणी समता फाउंडेशन व पोलीस प्रशासनाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले व त्या ठिकाणी पोलीस कंट्रोल रूम ची निर्मिती करण्यात आली मुख्य रस्त्यावर पोलीस चौकीची निर्मिती झाल्यामुळे अवैध बाबीकडे अंकुश बसणार आहे पोलीस चौकीचे सुशोभीकरण सुद्धा होणार आहे यामुळे सदर पॉईंट वर रोनक वाढणार आहे

@  जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या सोयीच्या दृष्टिकोनातून सतत रहदारी असलेल्या रस्त्यावर पोलीस चौकी उभारण्याची संकल्पना साकार झाली आहे@

देवेंद्र सिंग ठाकूर

 ठाणेदार

 रिसोड पोलीस स्टेशन

Post a Comment

Previous Post Next Post