मालेगाव :उमेश लहाने
सध्या राज्यभरात महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासन आपल्या दारी ही योजना कार्यान्वित करण्यात आली असून 21 जून रोजी करंजी येथे करूनेश्वर संस्थांनवर शासन आपल्या दारी कार्यक्रमाअंतर्गत लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रभारी मालेगाव तहसीलदार पी.मिनू होत्या तर प्रमुख उपस्थितीत मालेगाव तहसीलदार दीपक पुंड,नायब तहसीलदार रवींद्र भाबड,सरपंच अयोध्या खाडे, पो.पा. गोदावरी लहाने,पं. स.सदष्य सिद्धार्थ खिल्लारे,किशोर पाटील होते.यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी तहसीलदार दीपक पुंड यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती उपस्थित नागरिकांना दिली.प्रशासनाकडून जनतेच्या सर्व समाश्यांचा निपटारा करण्यासाठी कर्मचारी,अधिकारी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांसमोर डिगांबर लहाने,गोपाल लहाने,शिवाजी खांबलकर माजी सरपंच गोपाल लहाने यांनी सर्व सामान्य जनतेच्या विविध समस्या मांडल्या यामध्ये पी.एम.किसान योजनेची के. वाय .सी.नवीन खाते करणे,अपंग,विधवा,श्रावण बाळ नवीन फाईल निकाली लावणे,विविध मुद्यांचा समावेश होता.यावर समाधानकारक उत्तर व अंमलबजावणी करण्यासाठी निर्देश देण्याचे आश्वासन अधिकारी वर्गानी दिले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामसेवक विलास नवघरे,कृषिसहायक गणेश ठोकळ, गजानन ईढोळे, विनोद सोळंके, आनंद बर्वे,मंडळअधिकारी जे.सी.मोरे,तलाठी भगवानराव वाघ,जी.पी.बेदरकर,के.एल.अवचार,डी.व्ही.इंगोले,रवींद्र बोराडे,वरिष्ठ तंत्रज्ञ ईश्वर ठाकूर,आरोग्य सेविका अर्चना माळेकर, आरोग्य अधिकारी शुभांगी मोहळे, आरोग्य सेवक प्रशांत मस्के,महा सेतू सेवा केंद्र संचालक विष्णू लहाने,अंगणवाडी सेविका लक्षमी लहाने,उषा लहाने,ज्योत्स्ना खिल्लारे या सर्व कर्मचारी वर्गानी परिश्रम घेतले.तर कार्यक्रमाला माजी सरपंच राजेंद्र लहाने,गोपाल लहाने,सुरेश पाटील,डिगांबर खाडे, बाजार समिती संचालक भूषण खाडे, अमोल लहाने,विक्रीकर निरीक्षक अविनाश लहाने,उद्धवराव नवघरे सर्व ग्रामपंचायत सदष्य,कर्मचारी, अंगणवाडी मदतनीस,आशा वर्कर,महिला बचत गट सदश्या सर्व गावकरी मंडळी,महिला मंडळी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन छत्रपती शिवस्मारक समिती अध्यक्ष राजू पाटील लहाने यांनी केले.
