"भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या युवक प्रदेश उपाध्यक्षपदी केशव गरकळ यांची नियुक्ती"




प्रतिनिधी अन्सार शेख 


रिसोड : येथील युवा नेतृत्व केशव गरकळ यांची नुकतीच भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या युवक प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक विष्णुपंत भुतेकर व डॉ. जितेंद्र गवळी यांचे हस्ते केशव गरकळ यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी परसरामजी चोपडे, संजय सदर, संजय उगले, भूमिपुत्र शहर प्रमुख विकास झुंगरे, तालुका अध्यक्ष श्रीरंग नागरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रवीभाऊ चोपडे, जानराव देशमुख व भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी व शेतकऱ्यांसाठी सदैव तत्पर राहून काम करीत राहील असे केशव गरकळ यांनी सांगितले.केशव गरकळ यांच्या नियुक्तीमुळे नवयुकामध्ये नऊ चैतन्य निर्माण झाले असून केशव गरकळ यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post