रिसोड :स्थानिक प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या समोरील प्रांगणात अंतरराष्ट्रीय योग दिवस २१जुन् बुधवार च्या सकाळी उत्साहात साजरा करण्यात आला.विद्यालयाच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी ज्योती दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमाला शहरातील सुपरिचित योगा शिक्षिक विष्णुपंत खाडे,फिजिकल फिटनेस कोच सुनील काळे,पंकज साखरकर मुख्य योगा मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.प्रथम ज्योती दीदींनी सर्व मान्यवराचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.त्यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.फिजिकल फिटनेस ट्रेनर सुनील काळे यांनी योग दिवस का आणी केव्हापासून साजरा केला जातो हे सांगतांना दैनंदिन जीवनातील योगाचे महत्व स्पष्ट केले. जागतिक स्तरावर भारताने जगाला दिलेली अमूल्य भेट म्हणजे योग आहे.योगा प्राणायाम मुळे जागतिक स्तरावर आज भारताची सन्मानपूर्वक ओळख आहे. ऋषी मुनींनी जतन करून ठेवलेला हा बहुमूल्य ठेवा भावी पिढी च्या आरोग्यदायी जीवनाला उपयोगी पडावा यासाठी योग दिवसाला विशेष महत्व दिले जात आहे .जगातील असाध्य रोग नियमित योगभ्यास केल्याने समूळ नष्ट झाल्याची अनेक उदाहरणे देशातच नव्हे तर विश्वात बघावयास मिळतात.हा योगाचा वारसा पुढील पिढीला सुद्धा माहिती असावा यासाठी योग दिवस साजरा कऱण्यात येतो.
प्रत्येकाने स्वतःचे आरोग्य सांभाळण्यासाठी दिवसातून किमान अर्धा तास वेळ योग प्राणायाम करण्यासाठी द्यावा असे आवाहन योग प्रशिक्षक तज्ञांनी उपस्थिताना केले.सर्वांना सहज करता येतील अशा योगाचे प्रत्यक्षिक विष्णुपंत खाडे यांनी उपस्थितांकडून करवून घेतले.तर पंकज साखरकर यांनी योगा सोबत साधा आणी सहज व्यायाम केल्याने अनेक व्याधीवर नियंत्रण मिळविता येणे शक्य असल्याचे सांगितले व त्यांनी काही कवायतीचे प्रत्यक्षिक करून दाखविले.ब्रह्माकुमारी ज्योती दीदींनी विद्यालयातुन् नियमित शिकविला जाणारा राजयोग हा मनुष्य आत्म्याचा परमात्म्याशी संबध स्थापित करण्याचा मार्ग आहे.शरीरिक तंदुरुस्तीसाठी योग आसने उपयुक्त आहेत तसे मानसिक,बौद्धिक तंदुरिस्ती व सकारात्मक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्यासाठी राजयोग हा अत्यंत पभावी व परिणामकरक असल्याचे मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चवरे यांनी तर आभार ब्रह्माकुमारी वंदना दीदींनी मानले.कार्यक्रमाला रिसोड सेवा केंद्राचे ज्ञानार्थी भाऊ बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी स्वयंस्फूर्तीने योग प्राणायामाचा अभ्यास केला.
