संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे अंबिजळगाव मध्ये जल्लोषात स्वागत.



कर्जत प्रतिनिधी:-दिलीप अनारसे 

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे अंबिजळगाव मधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ग्रामस्थांच्या वतीने फटाक्यांच्या आतषबाजीने व टाळ मृदंगाच्या जयघोषात स्वागत करण्यात आले.कोरेगाव मुक्कामाऊन दिंडी सोहळा सकाळी न्याहारी साठी अंबिजळगाव मध्ये दरवर्षी प्रमाणे सोहळा दाखल झाला. गावातील तरुण मुलांनी निवृत्तीनाथांची पालखी खांद्यावर उचलून ज्ञानोबा माऊली तुकाराम चा जयघोष व निवृत्तीनाथ महाराज की जय असा जयघोष करीत संपूर्ण गावात मिरवणूक काढण्यात आली.तसेच या गावची वेगळीच परंपरा आहे.गावातील सर्व मंडळी दिंडी साठी भाकरी व आमटी घेऊन येतात मग त्या भाकरी वजन करुन गावकरी मंदीरात मोठा ढीग लावुन दिंडीचे चालक ह, भ, प, मोहन महाराज बेलापूरकर यांच्या हस्ते निवृत्तीनाथ महाराज यांना नौवद्य दाखवून गावात मोठी पतंग बसून स्वतः जेवण वाढु लागतात जेवण करुन गावातील भजनी मंडळ यांचा भजन.गौळणी, भारुड मोठ्या उत्साहात कार्यक्रम  करण्यात येतो. तसेच पुढे दिंडी शेगुड च्या दिशेने वाटचाल होते.

Post a Comment

Previous Post Next Post