अहमदनगर अफसर शेख
राहाता : मंदिर बांधण्याचे नावाखाली लोकांची फसवणूक करुन पैसे उकळणारी टोळी पकडण्याची कारवाई लोणी पोलिसांनी केली आहे.
प्रशांत सुरेश पगारे (वय-32, रा. खरजुलमळा, जेरलोड, नाशिक),: मिलिंद गिल्लू हाटे (वय 36, रा. स्टेशनवाडी, देवळाली कॅम्प, जि.नाशिक), सिद्धार्थ विवेक गायकवाड (वय-28, रा. डॉ. आंबेडकर वाडी, पुणे रोड, जिल्हा नाशिक), निलेश विनोद सोवदे (वय- 24, रा. उपनगर महाराष्ट्र हायस्कुलजवळ जि. नाशिक) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती स्वाती भोर मॅडम, श्रीरामपूर डिवायएसपी संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलिस ठाण्याचे स.पो.नि.युवराज आठरे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनि योगेश शिंदे, पोउपनि श्री घोडे, पोहेकॉ जायभाय, चापोहेकॉ भिंगारदिवे, पोकाॅ इंगळे यांनी ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. 21 जून 2023 रोजी लोणी येथे आठवडे बाजार असल्याने बाजारामध्ये लोणी पोलीस स्टाफ पेट्रोलींग करीत होते. या दरम्यान सपोनि. युवराज आठरे यांना माहिती मिळाली की, लोणी येथील मुख्य मार्केटमध्ये चार अनोळखी हे मंदिर बांधण्याच्या नावाखाली व्यापारी तसेच नागरिकांकडून बनावट देणगी पावतीचा वापर करुन पैसे उकळत आहेत. या सदर्भाने तात्काळ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्कळा संबंधित ठिकाणी पाठवण्यात येऊन खात्री करण्यात आली. त्यानंतर खात्री होताच बातमीतील संशयीत चौघे ताब्यात घेतले. त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी सुरुवातील उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यानंतर त्यांचेकडे कसून तपास करता त्यांचेकडे असलेले देणगी पावती पुस्तक व जमलेल्या पैशांबाबत विचारपुस करता त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांनी आम्ही मंदिर बांधण्याचे नावाखाली खोटे पावती पुस्तक बनवून लोकांकडून पैसे जमा करत असल्याचे सांगितले. यावरून पोहेकॉ जायभाय यांच्या फिर्यादीवरुन लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र.1 347/2023 भा. दं.वि. कलम 420, 467, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा पुढील तपास पोउनि विठ्ठल घोडे हे करीत आहेत.
गुन्ह्यात आरोपी प्रशांत सुरेश पगारे, मिलींद गिल्लू हाटे, सिद्धार्थ विवेक गायकवाड, निलेश विनोद सोवदे यांना अटक करण्यात आली.
त्यांचेकडुन 5 लाख 7 हजार 260 रुपये किं.ची त्यामध्ये एक पांढरे रंगाची स्विफ्ट कार (क्र. MH-02-CZ-8779) अंदाजे 5 लाख रु. किं.ची व ओमसाई मित्रमंडळ नावाने नांदुर शिंगोटे फाटा, दहिरे टोलनाका, पडघा बायपास, राहुरी फाटा शनिशिंगणापुर रोड असे वेगवेगळ्या पत्याचे बिना सिरीयल नंबर असलेले बनावट पावती पुस्तके व 17 हजार 260 रु. रोख रक्कम त्यात भारतीय चलनाच्या विविध दराच्या चनलनी नोटा, असे एकूण 5 लाख 7 हजार 260 रु. जप्त करण्यात आले.

