अहमदनगर अफसर शेख
गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बाधीत शेतकऱ्यांना १५०० कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सुमारे १६ लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील २७ लाख शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येईल.
*अशी असणार प्रतिहेक्टरी मदत
शेतीपिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने व निकषानुसार मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रती हेक्टर ८५०० रुपये, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी १७ हजार रुपये प्रती हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी २२५०० रुपये प्रति हेक्टर, अशी दाेन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत देण्यात येईल.
Tags
राजकीय
