जयपुर येथील विजयपथ व प्रगती शेतकरी गटाने केली बियाणे बिजप्रक्रिया



*कारंजा :* महादेव तायडे 

पानी फाउंडेशन च्या फार्मर कप स्पर्धेमध्ये सहभागी होऊन या वर्षी शेतकरी अतिशय उत्साहाने स्पर्धेच्या नियमाप्रमाणे सर्व कामे करीत आहेत. शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या SOP चे तंतोतंत पालन करत आहेत. दि.१७ जुन रोजी सायं.६ वा. जयपूर येथील विजयपथ सोयाबीन उत्पादक शेतकरी गट व प्रगती महिला शेतकरी गट यांनी एकत्र येऊन सामूहिक रित्या सोयाबीनच्या बियाण्याची रासायनिक बीज प्रक्रिया केली. 

या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी शालिग्राम पडघन , तालुका कृषी अधिकारी संतोष चौधरी ,पंचायत समिती सदस्या सौ.वैशालीताई काळे ,पंचायत समिती कृषीअधिकारी गोपाल अरबट ,मंडळ कृषी अधिकारी रविंद्र जटाळे ,कृषी पर्यवेक्षक गुणवंत ढोकणे,पानी फाउंडेशन मंगरूळपीर तालुका समन्वयक सुभाष गवई ,प्रशिक्षक मेघा चौधरी ,कारंजा तालुका समन्वयक रविंद्र लोखंडे ,प्रशिक्षक गजानन गांजरे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. गटामध्ये सहभागी सर्व शेतकऱ्यांनी  गावातील भजनी मंडळासह पानी फाउंडेशनने तयार केलेला शेतकऱ्यांचा पोवाडा भजनाच्या पद्धतीने सादर केला. या पोवाडयाचा आनंद घेत-घेत आज बियाण्याची रासायनिक बीजप्रक्रिया करण्यात आली. काम सुरू केव्हा झाले?आणि  संपले केव्हा ? हे कळले सुद्धा नाही. पोवाडा म्हणण्यात सर्वजण एवढे दंग झाले होते की, त्यामध्ये गटविकास अधिकारी पडघन साहेब यांनी स्वतः टाळ हातात घेत गावकऱ्यासोबत पोवाडा गायला. आज उपस्थित सर्व कृषी विभागाचे कर्मचारी सुद्धा उत्साहाने या पोवाडया मध्ये व बीज प्रक्रियेच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले व मार्गदर्शन सुद्धा केले.

यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. 

तसेच विजयपथ गटाचे सदस्य योगेश काळे यांचा वाढदिवसहि साजरा करण्यात आला.                      याप्रसंगी गट विकास अधिकारी शालिग्राम पडघन व तालुका कृषी अधिकारी संतोष चौधरी यांनी विजयपथ व प्रगती गटाच्या या कौतुकास्पद उपक्रमाबद्दल सत्कार केला. यावेळी  विजयपथ सोयाबीन उत्पादक शेतकरी गट व प्रगती महिला शेतकरी गटाचे सर्व सदस्य तथा गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन तथा आभार प्रदर्शन विजय पाटील काळे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post