शासन आपल्या दारी योजने अंतर्गत प्रमाणपत्र वितरण




मालेगाव / सुरज अवचार :-शासन आपल्या दारी योजने अंतर्गत वाशिम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एस षण्मुखराजन, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, मालेगाव तहसीलच्या प्रभारी तहसीलदार आय ए एस श्रीमती मिनू व संजय पुंड यांच्या मार्गदर्शनात गरजू व पात्र लाभार्थींना विविध योजनांसाठी लागणारे प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपूर्ण वाशिम जिल्हा सह मालेगाव तालुक्यात सुरू आहे. योजने अंतर्गत पात्र लाभार्थींना घरपोच प्रमाणपत्र वितरण शिरपूर जैन येथे शनीवारी  तलाठी जे एन साठे यांनी केले.

शासनाने पात्र लाभार्थींना विविध योजनांसाठी लागणारे  प्रमाणपत्र वितरणासाठी शासन आपल्या दारी ही योजना कार्यान्वित केली आहे. त्यानुसार अर्ज स्वीकारून दाखले तयार करण्यात येत आहे. हे दाखले वितरण करण्याचे काम विविध शिबिरातून तथा घरपोच पोहोचवण्याचे काम सदर योजनेचा माध्यमातून सुरू आहे‌. मंडळाधिकारी  देशपांडे यांच्या मार्गदर्शनात तलाठी जे एन साठे यांनी काही लाभार्थ्यांना दाखल्याचे वितरण केले. तर  बुधवार  २१ जून रोजी शिरपूर महसूल मंडळाचा वतीने आयोजन करण्यात येणाऱ्या शिबिरामध्ये शेकडो लाभार्थींना विविध प्रकारचा दाखल्याचे वितरण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. गरजू लाभार्थींना शासन आपल्या दारी योजना अंतर्गत त्वरित दाखले उपलब्ध व्हावे म्हणून मालेगाव तहसीलचे लिपिक दीपक लहाने,इतर कर्मचाऱ्यासह नायब तहसीलदार, तहसीलदार व तलाठी सेवा देत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post