अफसर शेख प्रतिनिधी
अहमदनगर – अहमदनगर शहरातील बालिकाश्रम रोड येथे सोमवारी रात्री 1वाजण्याच्या सुमारास ओंकार भागानगरे या युवकाची तलवारीने वार करून हत्या करण्यात आली आहे. दरम्यान या संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात गणेश हूच्चे, नंदू बोराटे आणी संदीप गुडा यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओंकारची हत्या हि अवैध धंद्याची तक्रार दिल्याने करण्यात आली असल्याची माहिती फिर्यादीने दिली आहे. त्यानुसार पोलीस तपास करत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक खैरे यांनी दिली आहे.
ओंकार भागानगरे या युवकाने गणेश हूच्चे हा अवैध धंदे करत असल्याने त्याने पोलिसांना त्याची तक्रार केली होती. तर पोलिसांनी देखील तक्रारीची दखल घेत कारवाई केली होती. पोलिसांनी हूच्चे याच्या अवैध धंद्यावर केलेल्या कारवाईचा राग धरून गणेश हूच्चे, नंदू बोराटे आणी संदीप गुडा यांनी ओंकारवर हल्ला करत त्याची हत्या केली आहे असे फिर्यादीत सांगण्यात आले.
खरंतर करण्यात आलेल्या हत्येचा कारणं देखील आता पोलीस तपासत आहे. पोलीस उपअधीक्षक खैरे यांच्या म्हणण्यानुसार आम्हांला कोणी अवैध धंद्याची तक्रार दिली तर आम्ही त्याचा नाव गोपनीय ठेवतो त्यामुळे या हत्येचा नेमकं कारणं आता पोलीस शोधत आहे.
तसेच ओंकार भागानगरे याच्या मित्राचा कोर्टात जामीन झाला होता. मात्र झालेला रेग्युलर जामीन रद्द व्हावा यासाठी आरोपी गणेश हूच्चे याने स्वःत पैशे खर्च करून त्याचा जामीन रद्द करण्याचा प्रयत्न केला होता अशी देखील चर्चा सुरू असल्याने ओंकार भागानगरे याचा खून नेमका कोणत्या कारणाने झाला याचा तपास आता पोलीस करत आहे.
सोमवारी रात्री 1 च्या सुमारास ओंकार भागानगरे, ओंकार घोलप आणी काही मित्र हें बालिकाश्रम रोड येथील त्यांच्या मित्राच्या वाढदिवसासाठी गेले होते. तेथे रात्री मोपेड गाडीवर अचानकपणे आरोपी हूच्चे, बोराटे आणी गुडा हें आले व त्यांनी रात्रीच्या काळोख्या अंधारात पांढऱ्या गोणितूण आणलेल्या तलवारी काढत ओंकारवर हल्ला चढवला होता. ओंकारवर सपासप वार करत त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.
दरम्यान ओंकारची हत्या करून आरोपी गणेश हूच्चे, नंदू बोराटे, आणी संदीप गुडा हें तिघे पसार झालें असून त्यांच्या मागावर पोलीसांचे तीन पथक अटकेसाठी रवाना करण्यात आले आहे.
