शेख अन्सार
रिसोड : रिसोड वाशिम मार्गावर नागठाणा जवळ १९ जून रोजी झालेल्या अपघातात प्राण गमवावे लागलेल्या तीन्ही तरुणांवर आज दि.20 जून रोजी दुपारी 3:00 वाजता त्यांच्या येवती या गावी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.दरम्यान, संपूर्ण गावात हळहळीचे वातावरण होते.संपूर्ण गावात कोणाचाही चूल पेटली नव्हती, कोणीही आपल्या कामाला गेले नव्हते.हे तिन्ही तरुण गावात चांगलेच ओळखीचे होते. त्यांच्या दुर्घटनेची बातमी समजताच त्यांचे नातेवाईक व आजूबाजूच्या गावातील लोकांनी येवती गाव गाठले.रिसोड तालुक्यातील येवतीचे तीन तरुण गणेश भानुदास शिंदे वय १७, दिनकर मारुती गायकवाड वय २५, अक्षय सखाराम जाधव वय १७ हे तिघेही कामानिमित्त वाशिमला गेले होते. पत्नीची औषधे घेण्यासाठी दिनकर हा त्याचा भाचा अक्षयसोबत वाशिम येथे दुचाकी घेऊन गेला होता.गणेशच्या अकरावीत प्रवेशाबाबत माहिती घेण्यासाठी तो दोघांसोबत गेला होता. परत निघण्यापूर्वी दिनकरने आपल्या दुचाकीची सर्विसिंग ही करून घेतली होती. परत येत असताना दुचाकीची समोरून येत असलेल्या पिके ला टक्कर झाली होती.त्यात तिघांचाही मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळताच येवती गावातील लोक मोठ्या संख्येने वाशिमला पोहोचले.अंतीम संस्कार वेळी कुटुंबियांचे अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. मृतकाचे आई वडील सह नातेवाकांनी एकच हंबरडा फोडला होता.
मृतांमध्ये गणेश शिंदे याने नुकतीच 10वीची परीक्षा उत्तीर्ण केली असून त्याला 80% गुण मिळाले आहेत.तो त्याच गावातील बाबासाहेब धाबेकर विद्यालयाचा विद्यार्थी होता.गणेश हा त्याच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.त्याला तीन बहिणी आहेत. एवढेच नाही तर गणेशचे वडील भानुदास हे एकूण चार भाऊ आहेत.आणि चार भावांपैकी गणेश हा एकुलता एक मुलगा होता, बाकी सर्व भावांना मुली आहेत.
मृतांमध्ये दिनकर गायकवाड आणि अक्षय जाधव हे दोघेही मामा भाचे होते.मामा भाचे असतानाही ते गावात मित्रा सारखे राहत होते आणि त्यांची ओळख मित्र म्हणून होती.अक्षय आणि गणेश हे खूप जवळचे मित्र होते. ते सोब राहत असत. अक्षय हा त्याच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा होता, त्याच्या मागे एक बहीण आहे.
मयत दिनकर याचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले असून, त्याची पत्नी गरोदर असून या अनुषंगाने तो वाशिम येथे गेला होता.परत येताना त्याने आपली दुचाकीही सर्व्हिस करून घेतली होती.दिनकर यांच्या पश्चात पत्नी, एक भाऊ व एक बहीण असा परिवार आहे. मोलमजुरी करून तो आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे.
कालच्या अपघाताचे वृत्त गावात समजताच गावात शोककळा पसरली, मात्र रात्री कुटुंबातील महिलांना याबाबत माहिती देण्यात आली नाही. या भावाची दक्षता घेत गावकऱ्यांनी आपल्या मोबाईलवर स्टेटस सुद्धा लावले नव्हते



