प्रतिनिधी अन्सार शेख
रिसोड : गेली कित्येक महिन्यापासून बंद पडलेले रिसोड शहरातील मोठे हॅमर्स लाईट व स्ट्रीट लाईट सुरु करण्याची मागणी माजी नगरसेवक फैय्याज अहेमद यांनी एका निवेदनाद्वारे मुख्याधिकारी सतीश शेवदा यांच्याकडे आज दिनांक 20 जून रोजी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की,मालेगाव नाका व वाशीम नाकातील लाईट मागील पाच-सहा महिन्या पासून बंद आहे ते त्वरित चालू करण्यात यावे साधारण वर्ष भरा पासून राज्य महा मार्गचे काम चालू असल्या मुळे तेथील हैमर लाईट खालचे केबल कटल्या मुळे हैमर लाईट बंद आहे. त्या मुळे येथील लोकांना रहदारीस खूप त्रास होत आहे व तसेच कालूशमिया दर्गा ते वाशीम नाका या रोड वरचे स्ट्रीट लाईट नगर परिषदने मागील 5 वर्षा पुर्वी लावले होते. लावल्या पासून आज पर्यंत फक्त दोन-चार महिने लागले त्याच्या नंतर आज पर्यंत स्ट्रीट लाईट बंदच आहे. लाईट नगर परिषदने लावले आणि रस्ता सार्वजनिक बांधकाम यांने बांधले आहे आणि आज रोजी बंद असलेले लाईटचे पोल फक्त देखावेचे झलेले आहे. त्यामुळे नगर परिषदने सिव्हील लाईन रोड वरचे लाईट व तसेच मालेगाव नाका व वाशीम नाका येथील हेमस लाईट लवकरात लवकर चालू करण्यात यावे जेणे करून रिसोड शहरा मध्ये सौंदर्यात भर पडेल रिसोड शहरातील मालेगाव नाका, वाशीम नाका, व सिव्हील लाईन रोड अंधार मुक्त होईल अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे निवेदन देताना माजी नगराध्यक्ष विजय तुरूकमाने, गजानन निखाते उपस्थित होते.
Tags
राजकीय
