शहाजी राजांनी शिवाजी महाराजांची राजमुद्रा संस्कृत भाषेतून तयार केली.. छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन अनेक हिंदू राजांनी सार्वभौम राज्य स्थापन केले. छत्रसाल बुंदेले यांचे उदाहरण आपण सर्वांना माहिती आहेच.हिदूसाम्राज्य दिनाचा सुवर्ण क्षण ....

 


राज्याभिषेक हा त्या राज्याचा आणि प्रजेचा एक श्रद्धा, स्वाभिमान, अस्मिता प्रगट करणारा सोहळा असतो तसाच तो एक आनंदसोहळाही असतो. राज्याभिषेकापूर्वी महाराजांनी राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळे देव देवता साधुसंत सत्पुरुष यांचा आपल्याला आणि राज्याला आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून मोठा दानधर्म केला. हिंदवी स्वराज्याची नवी राजधानी म्हणून शिवरायांनी किल्ले रायगडाची निवड केली.


ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या राज्याभिषेकमुहुर्तदिनी पहाटे मुख्य विधीला सुरुवात झाली. वेदमंत्रांच्या घोषात सर्व धार्मिक विधी झाल्यानंतर कर्णे, सनई चौघडे इत्यादी वाद्यांच्या निनादात अष्टप्रधानांनी शिवरायावर सुवर्णफुले, सुवर्ण होन, रौप्य व ताम नाण्यांचा अभिषेक केला. भव्य राजसभेत जमलेल्या सर्व प्रमुख सरदार, मनसबदार यांच्याबरोबरच इंग्रज वकील हेन्री ऑक्झिंडन व परराज्यातून आलेल्या प्रतिनिधींनी महाराजांना आपापले नजराणे अर्पण केलें, अशा पद्धतीने राजसभेतील मुख्य समारंभ पार पडला.. हत्तीवर बसून छत्रपती शिवराय जगदीश्वरच्या दर्शनाला गेले. आणि पाच सुलताशाह्यांच्या व पोर्तुगाली, सिद्धी, ब्रिटिश अशा परकीय जलचारांच्या छाताडावर बसून हिंदूंचे सार्वभौम सिंहासन स्थापन झाले.


अभिमानाने सांगावा असा आपला देदीप्यमान इतिहास आहे. शिवरायांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन आपली पुढील वाटचाल करण्याचा निश्चय हिंदूसाम्राज्य दिनाच्या निमिताने करूया.


छत्रपती शिवाजी महाराज की जय ।!!...... ✍🏻लेखन. मा.जयेशभाऊ अहिरे संस्थापक अध्यक्ष मातृछाया जनसेवा फाउंडेशन व संस्थापक अध्यक्ष रुद्र ढोल ताशा ध्वज पथक , सहसंपादक महाराष्ट्र लोकन्याय न्यूज चैनल.7273912727

Post a Comment

Previous Post Next Post