आज दिनांक २८-६-२०२३रोजी जिल्हा परिषद वाशिम येथे मा श्री दिगंबर लोखंडे साहेब उपमुखकार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रांम पंचायत कर्मचारी यूनियन पदाधिकारी सोबत तक्रार निवारण सभा आयोजित करण्याचे आदेश पंचायत विभाग यांच्या वतीने देण्यात आले होते त्याअनुषंगाने आज उपमुखकार्यकारी यांच्या दालनात मा श्री उदय राजपुत्र गटविकास अधिकारी पंचायत विभाग उज्ज्वल पुरी जिल्हा परिषद कर्मचारी या बैठकीला उपस्थिती बैठकीमध्ये यावेळी ग्रांम पंचायत कर्मचारी यांना दरमहा वेतन मिळणे ग्रांम पंचायत कर्मचारी यांचा राहणीमान भत्ता वाटप होणे बाबत व ग्रांम पंचायतचे कर्मचारी यांची सेवा जेष्ठाता यादी प्रसिद्ध करणे ग्रांम पंचायत कर्मचारी १०%पद भरती प्रक्रिया सुरू करणे कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्यात यावे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तक्रारीचे पुनरावलोकन निवारण करणे जलसुरक्षक यांचे
मानधन मिळणे पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दरसाह महीन्याला तक्रार निवारण सभा आयोजित करण्यात यावी इत्यादी विषयांवर चर्चा करून जिल्हा परिषद यांच्या वतीने दिलेल्या निवेदनाची सुची तयार करून आदेश निर्गमित करण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले यावेळी बैठकीला मा श्री विष्णू भाऊ मुळे जिल्हा अध्यक्ष मा श्री गजाननराव लांडगे जिल्हा सचिव डिगांबर सोनटक्के अमोल तुरक जिल्हा उपाध्यक्ष गंगाधर बोरकर रिसोड तालुका अध्यक्ष सुनिल लोखंडे तालुका सचिव संजय नखाते मालेगाव तालुका अध्यक्ष शामभाऊ लांडकर मालेगाव तालुका उपाध्यक्ष दत्तराव खेडकर सुनिल लोखंडे अर्जून राठोड दिगांबर दिहांडे विजय शेजूळ सोयम बाजड बबन सुर्वे संदिप गवई तालुका पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते अशी माहिती प्रमोद जयसिंगराव सांगळे जिल्हा प्रशिद्धी प्रमुख ग्रांम पंचायत कर्मचारी यूनियन यांनी दिली.

