प्रतिनिधी अफसर शेख
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) आंबेडकर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. दिपकभाऊ निकाळजे साहेब, महाराष्ट्र महिला अध्यक्षा मा.सुनिताताई चव्हाण, महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा.बाळासाहेब पवार साहेब, यांच्या आदेशानुसार नाशिक मध्ये मोर्चा दिनांक :15/06/23 रोजी आयुक्त कार्यालय वर धडक मोर्चा काढण्यात आला होता
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाच्या वतीने नांदेड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती केली याचा राग धरुन जातिवादी लोकांनी अक्षय भालेराव या बौद्ध बांधवाची निर्घृण पणे हत्या करण्यात आली तसेच बौद्ध समाजातील इंजिनिअरिंग चे शिक्षण घेणाऱ्या कु.हिना मेश्राम हिच्यावर बलात्कार करुन हत्या करण्यात आली,व्याजाच्या फक्त 3000 रुपये करिता मातंग समाजातील गिरीधारी तबकाले याचा निर्घृण खून करण्यात आला व नांदेड जिल्यातील मातंग समाजाने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून त्या सर्व 70 कुंटुबाना मारहाण करण्यात आली व समाजातील अन्याय व अत्याचार या सर्व घटनेचा , उत्तर महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने दिनांक: 15/06/23 रोजी वार:-गुरवार सकाळी ठिक - 11:00 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक नाशिक रोड ते विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक रोड या ठिकाणावरून जाहीर निषेध धडक मोर्चा काढण्यात आला होता, त्या वेळी सर्व पदाधिकारी व महिला वर्ग मोर्चा मध्ये सामील झाले होते
आयोजन:- उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा.शशिकांत दारोळे दक्षिण अहमदनगर जिल्हा संपर्क प्रमुख मा.बंडू आव्हाड
उत्तर महाराष्ट्र संघटक मा.विनोद भोसले महिला आघाडी नेत्या सौ.वंदनाताई संसारे
उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी सरचिटणीस सौ.ज्योतीताई देठे*,
नाशिक जिल्हा अध्यक्ष मा. अशोक गायकवाड
धुळे जिल्हा अध्यक्ष मा. दिनेश निकुंभ
जळगाव जिल्हा महासचिव मा.यशवंत बैसाने
अकोले तालुका अध्यक्ष मा.विजयभाऊ पवार प्राध्यापक नेतकर सर मा. सोमा कढरे, वकील मा .अभिजीत बिराडे नाशिक शहर अध्यक्ष प्रविण पवार, श्रीकांत काळे, अमित सपकाळे,अशोक बिडलान,पवन कुटे,मनोज साठे*,*सागर गायकवाड,राहुल कांबळे,पितांबर वाघ,अरुण घोलप,विनोद बिराडे, तान्हाजी वाघ, आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहून अन्याय व* *अत्याचार विरोधात आवाज उठविण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते
