अफसर शेख
निःस्वार्थ भाव ठेवून पांडुरंगाच्या ओढीने वारकरी दरवर्षी आषाढी वारीसाठी पंढरपूरला पायी जात असतात. वारकरी केंद्रबिंदू मानून प्रशासनाने वारकऱ्यांना मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत, असे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
“शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत दिव्यांग प्रमाणपत्र वितरण, अनुकंपा उमेदवारांना नियुक्तीपत्राचे वितरण आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, आदी उपस्थित हाेते.
*मंत्री विखे पाटील म्हणाले*
''पांडुरंगाच्या दर्शनासाठी नगर जिल्ह्यातून २६०, तर परजिल्ह्यातील २७ दिंड्या जातात. या दिंड्यांमधील वारकऱ्यांना वारीदरम्यान सर्व मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या प्रशासनाला सूचना देण्यात आल्या होत्या. प्रशासनाने अत्यंत कमी वेळामध्ये चोखपणे नियोजन करुन अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहे.