मालेगाव :प्रतिनिधी उमेश लहा
अलीकडच्या काळात अवकाळी पावसासोबतच अंगावर विज कोसळून जिवीत हानी होण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे या नैसर्गिक संकटाची शेतकरी शेतमजूर तथा नागरिकांनी धास्ती घेतली आहे तेव्हा हे जिवघेणे संकट टाळण्यासाठी यवतमाळ व वाशीम जिल्ह्यात ठिकठिकाणी विजरोधक यंत्रणा बसवून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी खासदार भावना गवळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.
खासदार गवळी यांनी निवेदनात पुढे म्हटले की, निसर्गाच्या असमतोलामुळे अवकाळी पाऊस
विज कोसळण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली. अशा घटना रोखण्यासाठी राज्यभरात वीज अटकाव यंत्रना कार्यान्वित करण्यात आली. दरम्यान, वाशीम जिल्ह्यातही गत काही वर्षात जिल्ह्यात मनुष्य व पशुधनाची जीवितहानीच्या घटनांमध्ये वाढ झाली. मागील तीन वर्षात विज कोसळल्याने १४ जणांचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणात जनावरे दगावली आहेत. दरम्यान, मागील आठवड्यात मान्सूनपूर्व वादळी पावसाने तांडव घातले यावेळी विज कोसळल्याने वाशीम जिल्ह्यातील दोन तरुण शेतकयांना जीव गमवावा लागला सोबतच मोठ्या प्रमाणात पशुधन दगावले आहे.मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात खा भावना गवळी यांनी विजरोधक यंत्रणा ठिकठिकाणी बसवन्याची मागणी केली आहे.
