ठाणे :- पाऊस लांबलेला आहे तरी जलसाठा पुरेसा असल्याने किमान जून अखेरपर्यत पाणी कपात होणार नाही.अशी ग्वाही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना . शंभूराज देसाई यांनी दिली. बुधवारी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत विविध विभागांची आढावा बैठक घेतल्यानंतर ना. देसाई पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी त्यांनी एमआयडीसी कडून होणारी पंधरवड्यात एकदा १० टक्के पाणी कपात मात्र तूर्तास सुरु असल्याचे स्पष्ट केले.
पाऊस लांबण्याची शक्यता लक्षात घेऊन जलसाठ्यांची परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पालकमंत्री देसाई यांनी जून अखेरपर्यत कोणतीही पाणी कपात होणार नसल्याचे स्पष्ट केले. तरीही पावसाने ओढ दिलीच तर टँकरने पिण्याचे पाणी पुरवण्याचे आदेश सर्व मनपा आयुक्तांना दिल्याचे ना.शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.
Tags
राजकीय
