जय सेवालाल च्या गजराने रिसोड तालुका दुमदुमला





कु-हा,भर जहागीर रिसोड येथिल ग्रामस्थांनी केली चहा,फराळाची व्यवस्था



रिसोड : जालना जिल्ह्यातील गुळखंड तांडा येथुन श्रीक्षेत्र पोहरादेवी येथिल धर्मगुरू सतगुरू डाॅ.रामराव महाराज यांच्या 88 व्या जन्मोत्सवा निमित्त सतगुरू सेवालाल महाराज पालखी रथ पायी दिंडीतील शेकडो वारक-यांच्या 'जय सेवालाल जयघोषाने' रिसोड तालुका दुमदुमला.या दिंडीतील वारक-यांच्या फराळ,चहापाणाची व्यवस्था तालुक्यातील भर जहागीर येथे शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आली होती. व तसेच रिसोड शहरात आगमनाप्रसंगी विविध ठिकाणी चहा पाणी नाष्टा ची व्यवस्था गरिकांकडून करण्यात आली होती. 

   देशातील बंजारा समाज बांधवांची काशी म्हणुन पोहरा देवी या देवस्थानाकडे पाहील्या जाते.'गुरू पौर्णिमे" ला लाखो भक्तांची मांदीयाळी पोहरा देवी येथे एकत्र येतात.जालना जिल्ह्यातील गुळखंड तांडा,वाटुर तांडा येथुन आश्वधारी दिंडी संत योगानंद बापु यांच्या हस्ते पालखीचे पुजन करीत प्रस्थान होते.सुमारे बारा दिवसांच्या पायंदळी प्रवासा नंतर पालखीचे पोहरादेवी येथे प्रस्थान होते.या दरम्यान बारा मुक्काम वर शेकडो अन्नदात्यांच्या माध्यमातून चहा,फराळ,जेवणाची व्यवस्था मोफत करण्यात येते.तर अनेक दानशुरांच्या माध्यमातून वारक-यांसाठी पीण्याचे पाणी,दैनंदिन लागना-या वस्तुंचे मोफत वितरण करण्यात येते.तर पालखीतील दैनंदिन पुजा पाठ,आरतीची व्यवस्था सुरेख पणे करण्यात येते.भर जहागीर येथे कु-हा ,भर जहागीर  रिसोड शहरातील अन्नदात्यांनी फराळ,चहाची मोफत व्यवस्था केली होती.यावेळी रिसोड शहर कुऱ्हा,जवळा,मांडवा,मोहजाबंदी येथिल बंजारा तांड्यातील शेकडो भावीक भक्तांनी पालखी दर्शनाचा लाभ घेतला,तर काहींनी पालखी मध्ये सहभाग घेतला,यावेळी दिंडीतील शेकडो भक्तांच्या 'जय सेवालाल'च्या गजराने रिसोड नगरी दुमदुमली होती.

Post a Comment

Previous Post Next Post