रिसोड येथेआषाढी एकादशीला कुर्बानी न देण्याचा निर्णय; मस्लिम बांधवांकडून एकोप्याचे दर्शन

     




रिसोड :  आषाढी एकादशीच्या दिवशी तालुक्यातील हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये एकोप्याचे दर्शन पाहायला मिळत आहे. यंदा आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आहे. हिंदु बांधवांसाठी फार मोठा दिवस असून पंढरपूर वारकऱ्यांनी तुडूंब भरुन जाते. हिंदू आणि मुस्लिम बांधवांचे सण एकत्रच आल्यामुळे या दिवशी बकरी ईद रोजी कुर्बानी न देण्याचा आणि मांस विक्री न करण्याचा निर्णय रिसोड तालुक्यातील  मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. 

     आषाढी एकादशी अवघ्या काही तासात आली आहे. यामुळे प्रत्येकाला विठ्ठलाची आणि आषाढीची आतुरता लागून आहे. मात्र यंदाची आषाढी एकादशी वेगळी ठरणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईद आल्याने हे दोन्ही सण एकाच दिवशी साजरी होणार आहेत. मात्र, या सणाच्या निमित्ताने रिसोड तालुक्यामध्ये हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन बघायला मिळत आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी मुस्लिम बांधवांच्या वतीने कुर्बानी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post