अज्ञात व्यक्तीने सोलर पॅनल ची केली तोडफोड शिरपूर पो.स्टे येथे अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल




केनवड प्रतिनिधी ता.२८

          शेतात कुणी नसल्याचे पाहून अंधाराचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने किसन गजानन भोसले यांच्या शेतातील एका प्लेट फोडून 21000 रुपयाचे नुकसान केले आहे, याबाबत नुकसानग्रस्त शेतकरी किसन गजानन भोसले यांनी 26 जून 2023 रोजी शिरपूर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देत कारवाईची मागणी केली आहे, सध्या पावसाळा सुरु झाला आहे परंतु पावसाचा पत्ता नाही.पाऊस कधी येईल या आशेने आकाशाकडे बघत असताना केनवड येथील शेतकरी किसन गजानन भोसले यांच्या शेतातील सोलर पॅनलचे तोडफोड करून आर्थिक नुकसान अज्ञात व्यक्तीने केले आहे. अश्या कृत्यामुळे सदर शेतकरी यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

   केनवड शेत शिवारात गट नंबर 474 मध्ये किसन भोसले यांची दीड एकर शेती असून त्या शेतात विहीर आहे, सदर विहिरीवर मी शेताला पाणी देण्याकरीता एक वर्षा अगोदर शासनाकडून जी.के या कंपनीचे  5.एच.पी चा सोलर मोटारपंपसेट बसवीला होता ता.२५/६/२०२३ रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता चे सुमारास मी माझे केनवड शेत शिवारामध्ये पाईपलाईनचे लिकेजचे काम केले तेव्हा माझे शेतातील मोटर पंप करिता लावलेल्या सोलर प्लेट व्यवस्थित होत्या.ता.२६/६/रोजी सकाळी १० वा दरम्यान मी माझे केनवड शेत शिवारामध्ये असलेल्या शेतात नाला खोदण्यासाठी गेलो असता माझ्या शेतातील विहिरीवर गेलो तेव्हा मी बसवलेल्या माझे शेतातील विहिरीवर बसविलेले जी. के. या कंपनीचे सोलर सेट प्लेट मधील एका प्लेटला अज्ञात व्यक्तीने तोडून 21,000 रुपयांचे नुकसान केले आहे , याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून शिरपूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post