बंद पडलेले आधार सेंटर सुरू करण्याची एमआयएमची मागणी




रिसोड : गेल्या काही महिन्यांपासून रिसोड शहर व ग्रामीण भागातील काही आधार केंद्र बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.  केंद्र सरकारने जुने आधार कार्ड अपडेट करण्याची घोषणा केल्यापासून प्रत्येकाला आपले आधार अपडेट करावे लागत आहेत.परंतु रिसोड शहर व तालुक्यातील काही ग्रामीण भागातील आधार केंद्र बंद असल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सदर बाब लक्षात घेता रिसोड एम आय एम च्या वतीने आज दिनांक 28 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन देऊन सदर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.निवेदनात म्हटले आहे की शासनाने आधार अपडेट करण्याची घोषणा केल्यापासून प्रत्येक जण आपल्या आधार अपडेट करण्यास धावपळ करीत आहे. यामध्ये मात्र बंद असलेले आधार केंद्र ही डोकेदुखी ठरत आहे तर काही नागरिकांना कागदपत्र संबंधित मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. यामध्ये कागदपत्रात संबंधित काही बाबी शिथिल करण्यात याव्या अशी मागणी ही निवेदनात करण्यात आलेली आहे. निवेदन देताना मोहम्मद आसिफ नूर मोहम्मद रिसोड़ शहर अध्यक्ष,वसीम साहिब खा पठान,रिसोड तालुका युथ अध्यक्ष,जियाउर खान जब्बार खान,सैयद नाजिम सैयद मीर,युथ शहर अध्यक्ष रिसोड़,शेख अलीम शेख मुस्लिम,शोएब शाह नूर शाह उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post