कर्जत तालुक्यात मान्सूनने बऱ्यापैकी हजेरी लावताच पेरणीला प्रारंभ....




कर्जत प्रतिनिधी, दि.२८ :- दिलीप अनारसे 

कर्जत तालुक्यात रविवारी व मंगळवारी सलग दोन तीन दिवस प्रथमच मान्सूनने बऱ्यापैकी हजेरी लावली या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता लगेच तालुक्यात मका, कपाशी, उडीद, इत्यादी पिके करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. जून महिना संपत आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट दिसून येत आहे. पाऊस यंदा येणार की नाही याची चिंता लागत असल्याने, बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत होता. पण मंगळवारी दुपारी बारा वाजल्यापासून संपूर्ण तालुक्यात बऱ्या प्रमाणात पाऊस झाला. पाऊस पडताच बाजारपेठेत कृषीच्या दुकानांत शेतकऱ्यांची बियाणं करणे खरेदी करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. मुसळधार पाऊस नसला तरी देखील, या पावसाने पेरणी करण्याइतके हजेरी लावली असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसून येत आहे. मागील आठवड्यात थोडासा रिमझिम पद्धतीने पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मात्र कपाशीचे बियाणे लावण्यासाठी प्रारंभ केला होता. शेतकऱ्यांनी पेरतं व्हा असा इशारा देत तो चातक पक्षी वारंवार खुनवंत आहे. हा चातक पक्षी फक्त पाऊसाचे पाणी पिऊन आपली तहान भागवता. एक पाऊस होऊन थांबल्याने परत पेरणी स्थगित करण्यात आली मात्र मंगळवारी दुपारपासून पाऊस झाल्याने तालुक्यातील शेगुड, माळंगी, डोंबाळवाडी, अंबिजळगाव, अळसुंदे, कोरेगाव,कुळधरण, मिरजगाव, माहिजळगाव, राशीन, या भागातील ग्रामीण भागातील  बुधवारपासून शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे.पण शेतीसाठी बैल जोडी दुर्मिळ झाल्याने लहान, मोठे ट्रॅक्टर च्या साह्याने शेतकरी पेरणी व मशागत करण्यासाठी पसंती देत आहेत असे दिसते.

Post a Comment

Previous Post Next Post