शिरूर-करडे गावातील एका शेतकरी कुटुंबातील आणि शिक्षक आदरणीय कैलास फक्कड पाचर्णे यांच्या मुलाची निवड भारतीय नौदलात लेफ्टनंट पदी निवड झाल्या निमित्ताने या मुलाचा नागरी सत्कार आणि गुणगौरव सोहळा शिरूर तालुका आजी माजी सैनिक परिवार आणि शिरूर तालुक्यातील शिक्षक परिवार यांनी आयोजित केला होता त्यावेळचा प्रसंग.
यावेळी अनेकांची मनोगते आणि अनुज ला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या त्यामध्ये कर्नल सुरेश पाटील साहेब, सुप्रीम कोर्टाचे वकील आणि माजी सैनिक आदरणीय संजयजी शिरसाट साहेब, प्रभाकर थेऊरकर साहेब, बंडू तात्या कोहोकडे साहेब, सुरेश उमाप साहेब आणि शिक्षक नेते तसेच पुणे जिल्हा परिषद नियोजन मंडळाचे सदस्य आदरणीय राहुल दादा पाचर्णे साहेब आदींची भाषणे झाली. अखेर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली व प्रत्येकाने
मिस्टानाचा स्वाद घेतला.
भारत माता की जय..
Tags
सामाजिक

