विठुराया अन् आषाढीचे महत्त्व शहर परिसरातील शाळांमधील चिमुकल्यांनाही समजावे, या उद्देशाने बुधवारी विविध शाळांमध्ये आषाढी एकादशी साजरी करण्यात आली.
प्रतिनिधी शंकर तिडके
रांजणगाव गणपती येथे बुधवार रोजी (दि. 28) महाराष्ट्र मध्ये साजरी होत असलेल्या आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी, भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला रवाना झाले आहेत. विठुराया अन् आषाढीचे महत्त्व शहर परिसरातील शाळांमधील चिमुकल्यांनाही समजावे, या उद्देशाने बुधवारी विविध शाळांमध्ये आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. वृक्षदिंडी, रिंगण असे अनेक उपक्रम यावेळी राबविण्यात आले. चिमुकल्यांनी विठुनामाचा जयघोष करीत त्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
शाळेतर्फे वृक्षदिंडी काढण्यात आली.विठ्ठल-रखूमाई, वारकऱ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी हाती टाळ घेत चंद्रभागेच्या तिरी, पाऊले चालती,विठ्ठलनामाची शाळा भरली... यांसारखी गीते व भजने विद्यार्थ्यांनी सादर केली.
एकादशीची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. झाडे लावा, झाडे जगवा, वृक्ष लावा, मोक्ष मिळवा अशा विविध घोषणा देत दिंडीतून चिमुकल्यांनी नागरिकांना झाडांचे महत्त्व पटवून दिले.
संकल्प सिटी रांजणगाव गणपती ते महागणपती मंदिरापर्यंत शाळेतर्फे दिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा केली होती. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी या अभंगानुसार विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्त्व यावेळी सांगण्यात आले. युनिक इंटरनॅशनल शाळेचे अध्यक्ष-श्री देविदास सुरवसे प्राचार्य सो मयुरी डेरे यांनी मार्गदर्शन केले
त्यावेळी शाळेचे
अध्यक्ष - श्री.देविदास सुरवसे
प्राचार्य - सौ .मयुरी डेरे.
सह संयोजक- श्रीमती प्रिया निंबरमुंडे.तबला वादक - कुमार भालेकर
गायक- अरुण भालेकर
आणि सर्व शिक्षक कर्मचारी आदी उपस्थित होते.



