अफसर शेख
नगर जिल्ह्यात पर्यटन वृद्धी, औद्योगिकरण वाढविण्यासाठी एमटीडीसीला सर्वंकष विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहे. हा आराखडा लवकरच तयार केला जाईल. यामुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होईल. राज्य सरकारने पंढरपूरचा २७०० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. याच धर्तीवर नगर जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
उपस्थिती
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे आदी उपस्थित हाेते.
Tags
राजकारण
