रेती लवकरात लवकर चालू करण्यात यावी काँग्रेस कमिटी रिसोड शहरच्या वतीने तहसीलदारांना निवेदन



प्रतिनिधी अन्सार शेख

रिसोड.रेती बंद  असल्यामुळे सध्या रोज मजुरी करणाऱ्या मजुरावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे अनेक मजुरांचा रोजगार ठप्प झाला आहे रेती नवीन नियमानुसार त्वरित चालू करावी याबाबतचे निवेदन तहसीलदार यांना ९ जूनला देण्यात आले आहे. देशाचे पंतप्रधान एकीकडे म्हणतात की आम्ही रोजगार उपलब्ध करून देऊ  परंतु शासन कोणताही निर्णय घेत नाही तरी रेती लवकरात लवकर चालू करावी अन्यथा सर्व बांधकाम कामगार येथे येत्या दहा दिवसात शासनाने रेतीचा निर्णय जर घेतला नाही तर तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष राजू राऊत यांनी दिला आहे यावेळी अमोलभाऊ नरवाडे युवक काँग्रेस शहराध्यक्ष भारत गुंजकर, अनिता सोळंके गजानन निखाते,फैयाज अहमद,बळीराम बोडखे, डॉक्टर टाले रोहित दांदडे,इमरान खान, गोपाल मोरे, संदीप पवार, विजय पंडित, राजू जुमडे,रामकृष्ण शेळके, बळीराम बोडखे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post