संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे संगमनेरात स्वागत




अहमदनगर अफसर शेख


शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे आज अहमदनगर जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी अत्यंत भक्तीमय वातावरणात डॉ. जयश्री थोरात यांनी या पालखीचे स्वागत व पूजन केले.

पारंपरिक वाद्यांच्या गजरात स्वागत

पंढरपूरसाठी निघालेल्या या पालखीचे पारेगाव बुद्रुक येथे सुमारे वीस हजार वारकऱ्यांसमवेत आगमन झाले. यावेळी डॉ. जयश्री थोरात यांनी पालखीचे पूजन केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, डॉ. दत्तात्रय गडाख, त्र्यंबक गडाख, रावसाहेब गडाख, साहेबराव गडाख, संध्या गडाख, सोपान येलके, सोमनाथ गडाख आदींसह विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. लेझीम पथक, पारंपारिक वाद्य व वेशभूषा करून गावकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी या पालखीचे स्वागत केले. महाराष्ट्राला मोठी सांस्कृतिक व धार्मिक परंपरा असून यावर्षीही राज्यात भरपूर पाऊस पडू दे, शेतकरी सुखी होऊ दे, अशी प्रार्थना डॉ. जयश्री थोरात यांनी यावेळी केली.

Post a Comment

Previous Post Next Post