.
प्रतिनिधी -रुपेश बाजड
रिसोड तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या पिंपरखेड , कुऱ्हा,मसलापेन,कोयाळी खू या गावांची ऑगस्ट २०२२ पासून ९ महिने झाले तरी नुकसानभरपाईची रक्कम अद्याप मिळाली नाही. तर परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या जवळपास ३७ गावची ऑक्टोंबर २०२२ पासून ऑनलाईन प्रणालीमुळे फक्त तालुक्यातील ४०% लोकांच्याच खात्यावर अतिवृष्टीच्या नुकसाभरपाईचे पैसे जमा झाल्याची माहिती आहे.खरीप २०२२ शेतकऱ्यांच्या हातातून गेल्यानंतर सरकारी मदत तरी लवकर मिळेल अशी अपेक्षा लावून शेतकरी बसला होता.त्यातही पुन्हा खरीप तोंडावर आलेला असताना आणि शेतकऱ्यांकडे बी बियाणे ,खतांसाठी तरी ही रक्कम कामी पडेल अशा आशेवर शेतकरी बसला आहे.प्रशासनाकडे किती जणाचे पैसे बाकी आहेत की जणांचे मिळाले अशी कुठलीही माहिती उपलब्ध नाही .ऑनलाईन प्रणालीमुळे सगळा गोंधळ झालेला आहे तरी तात्काळ याविषयाकडे गांभीर्याने लक्ष घालून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी मा.जिल्हाधिकाऱ्यांकडे काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य राहुल बोडखे यांनी केली.
