वाशिम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पी सी आर एस द्वारे खड्डे मुक्त योजना राबवणार -प्रवीण सरनाईक



प्रतिनिधी उमेश लहाने


मेडशी:- सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिम यांच्याद्वारे पी सी आर एस द्वारे खड्डे मुक्त योजना राबविण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रवीण सरनाईक यांनी माहिती दिली


खड्डे मुक्त योजनेची प्रभावी अंमलबजावणी करनेकारिता महाराष्ट्र शासनाद्वारे पीसीआरएस ॲप सुरू करण्यात आले आहे या माध्यमातून सार्वजनिक विभाग वाशिम यांनी जिल्ह्यात खड्डे मुक्त करण्याचा निर्धार केला आहे सामान्य माणसांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता नागरिकांनी पीसीआरएस हा ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्यावा कोणत्याही नागरिकांची खड्डे विषयी तक्रार असल्यास त्यांनी आधी खड्ड्याचा फोटो काढावा व नंतर सदर प्रणालीमध्ये फोटो अपलोड करावा सदर फोटो वरून रस्त्यावर पडलेल्या खड्डा ७२ तासात च्या आत भरण्यात येईल अशा सूचना कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिम यांनी दिले आहेत कोणत्याही नागरिकांनी रस्त्यावर खड्डा दिसल्यास त्याचा फोटो त्वरित काढून अपलोड करून संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून द्यावा त्यामुळे रस्त्यावरील खड्डे त्वरित भरल्या जाणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास कमी होईल खड्ड्याचा फोटो खड्डे त्वरित भरण्याचे सूचना अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ अकोला तसेच कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम वाशिम यांनी दिले आहेत नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये सदर ॲप डाऊनलोड करून घेण्याचे आवाहन करण्यात आले असून टोल फ्री क्रमांक 91 22 26 20 16 झिरो चार वर संपर्क करण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभाग चे कार्यकारी अभियंता प्रवीण सरनाईक यांनी केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post