कारंजा प्रतिनिधी / अशोकराव उपाध्ये .
खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांनी बी बियाणे खते कीटकनाशक औषधी खरेदी करताना काळजी घ्यावी असे आवाहन कारंजा तालुका कृषी अधिकारी संतोषराव चौधरी यांनी शेतकऱ्यांना केले आहे . शेतीची पेरणी पूर्व मशागत अंतिम टप्प्यात आली असून शेतकऱ्यांनी बी बियाणे खरेदी करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत .दरम्यान खरीप हंगामात शेतकऱ्यांची गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच बी बियाणे रासायनिक खते व कीटकनाशके औषधी खरेदी करावी जेणेकरून शेतकऱ्यांची फसवेगिरी टाळल्या जाईल . शेतकऱ्यांनी कोणतेही बियाणे खते कीटकनाशक खरेदी करताना अधिकृत विक्रेत्याकडून पक्क्या पावती सह खरेदी करावी या पावतीवर शेतकऱ्यांची व विक्रेत्यांची स्वाक्षरी व मोबाईल नंबरची नोंद करून पिक निघेपर्यंतची पावती सांभाळून ठेवावी. खरेदी केलेल्या बियाण्याचे वेस्टन ;पिशवी टॅग ; खरेदीची पावती व त्यातील थोड बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे .भेसडीची शंका दूर करण्यासाठी बियाणेची पाकीट शील बंद करण्याची खात्री करावी . पेरणी आधी बियाण्याची उगवण क्षमता तपासावी .शेतकऱ्यांनी बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावरची अंतिम मुदत पाहून घ्यावी तसेच सोयाबीन बियाण्याची उगम क्षमता घरी तपासून पेरणी करायला हवी . महत्त्वाची बाब म्हणजे कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री किंवा इतर तक्रारीसाठी शेतकऱ्यांनी जवळच्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा असा मौलिक सल्ला कारंजा तालुका कृषी अधिकारी संतोषराव चौधरी यांनी काजळेश्वर भेटीत दिला आहे .
