भाजपच्या निष्ठावंतांकडून विखे-शिंदे विराेधात नाराजी




*अहमदनगर अफसर शेख


 सध्याच्या राजकारणात विखे पिता-पुत्र व आमदार राम शिंदे यांच्याकडून जिल्ह्यातील भाजप निष्ठावंतांना डावलले जात असल्याची भावना व्यक्त हाेत आहे. नगरमध्ये नुकत्याच रविवारी झालेल्या भाजपच्या प्रमुख निष्ठावंतांच्या बैठकीत विखे, शिंदे यांच्या कार्यपद्धतीच्या विराेधात थेट नावे न घेता नाराजी व्यक्त करण्यात आली. लवकरच पक्षश्रेष्ठींसमाेर व्यापक भूमिका मांडण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.      

भाजप निष्ठावंतांची शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, अल्लाउद्दीन काझी, शांतिलाल कोपनर, बाळासाहेब सोनवणे, अनिल गट्टाणी, अशोक खेडकर, रघुनाथ आंबेडकर, दादासाहेब बोठे आदी जिल्हाभरातील कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.  

*प्रचार न करण्याचा इशारा*

गेल्या ४० वर्षांपासून अनेकांनी भाजप वाढीसाठी परिश्रम घेतले. मात्र, आता निष्ठावंतांना डावलले जात असेल, तर उपयोग काय, असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. आता निष्ठावंतांनाच जिल्हाध्यक्ष करावे, अन्यथा निष्ठावंत कार्यकर्ते मतदान करणार नाहीत व कोणाच्या प्रचारालाही बाहेर पडणार नाहीत, असा इशारा बैठकीत देण्यात आला. 

 जिल्हाभरातील सर्व जुन्या निष्ठावंतांना एकत्र करून लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेण्याचे ठरविण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post