*अहमदनगर अफसर शेख
दूध दरामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी सहकारी आणि खासगी दूध संघाची एकत्रिपणे बैठक घेण्यात येईल, कोणत्याही परिस्थितीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत महसूलमंत्री विखे पाटील यांनी नुकताच राहाता तालुक्यातील कनकुरी, नादुर्खी खुर्द या गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला. शासन योजनांची माहिती देऊन नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
*मंत्री विखे पाटील म्हणाले*
''दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात राज्य सरकार गंभीर आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही. राज्यात लम्पी संकट मोठ्या प्रमाणात आले असताना जनावरांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला. ज्यांची जनावरे दगावली त्यांनाही आर्थिक मदत राज्य सरकारने केली आहे.''
