रेती सुरू करण्यात यावी यासाठी उपोषण




रिसोड.रेती बंद असल्यामुळे सध्या रोज मजुरी करणाऱ्या मजुरावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे अनेक मजुरांचा रोजगार ठप्प झाला आहे रेती नवीन नियमानुसार त्वरित चालू करावी याबाबतचे वारंवार मागणी करूनही शासन याकडे लक्ष देत नाही.सद्यस्थितीत बांधकाम मजूर वर्ग उपासमारीच्या संकटात असून कर्जाच्या बोजाखाली दबत आहे या विषयावर येथील युवक कांग्रेस रिसोड मालेगांव विधानसभा उपाध्यक्ष रियाज खान रसूल खान हे आज 12 जून पासून रिसोडच्या तहसील कार्यालया समोर उपोषणाला बसले आहे.शासनाने त्वरित याकडे लक्ष द्यावे अशी मागणी खान यांनी केलेली आहे. सदर उपोषणाला शहरातील बांधकाम मजूर मिस्त्री ठेकेदार अभियंता हार्डवेअर व्यापारी सामाजिक संघटनेने आपला पाठिंबा दर्शविलेला आहे. रेती नसल्याने रिसोड शहर तालुक्यातील मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात अन्य राज्यात पलायन करत असल्याचे दिसून येत आहे.हाताला रोजगार पोटाला भाकर मिळावी या उद्देशाने काही परिवार अन्य राज्यात गेले असल्याचे चर्चेतून कळत आहे.आर्थिक संकटात उपासमिरीची वेळ आलेल्या मजुरावर रेती उपलब्ध झाल्यास त्यांना दिलासा मिळेल यामुळे सदर बाबीकडे लवकरात लवकर दक्ष देण्याची मागणी केली जात आहे

Post a Comment

Previous Post Next Post