भाजप नेते ॲड.नकुल देशमुख यांची रिसोड विधानसभा निवडणूक प्रमुख पदी निवड प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केली निवड जाहीर



प्रतिनिधी अन्सार शेख

रिसोड - भाजप नेते नकुल देशमुख यांची रिसोड मालेगाव विधानसभेच्या निवडणूक प्रमुख पदी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबई येथे प्रदेश कार्यालयात केली.

महाराष्ट्रभरातील विधानसभा क्षेत्रातील व लोकसभा क्षेत्रातील निवडणूक प्रमुखांची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल मुंबई प्रदेश कार्यालयात केली यामध्ये २८८ विधानसभा निवडणूक प्रमुखांची घोषणा सुद्धा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने माजी मंत्री माजी आमदार आमदार खासदार यांना लोकसभा निवडणूक प्रमुख व विधानसभा निवडणूक प्रमुख यांची मुख्य जबाबदारी देण्यात आलेली आहे. तसेच अकोला लोकसभे च्या निवडणूक प्रमुख म्हणून अनुप संजय धोत्रे यांची निवड करण्यात आली. तर रिसोड मालेगाव विधानसभेच्या निवडणूक प्रमुख पदी ॲड. नकुल दादा देशमुख यांची निवड करण्यात आली. त्या करण्यात आलेल्या निवडी अतिशय महत्त्वाचे असून भारतीय जनता पक्षाला विधानसभा क्षेत्रात मजबूत करण्यासाठी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या निवडणूक प्रमुख यांच्यावर देण्यात आलेले आहेत सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील नऊ वर्षात राबविलेल्या गोरगरिबांसाठी सामान्यांसाठी समाजातील शेवटच्या घटकांसाठी च्या योजना तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावलेला देशाचा गौरव या सर्व गोष्टी निवडणूक प्रमुखांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा मुख्य हेतू लोकसभा प्रमुखांचा व त्या माध्यमातून विधानसभा निवडणुकांचा राहणार आहे. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात सरकारच्या माध्यमातून राबवलेल्या लोकहिताच्या योजना तसेच महाराष्ट्राची ओळख देश स्तरावर नव्हे तर राष्ट्र स्तरावर होईल असे राबविलेले प्रोजेक्ट तसेच सरकारच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलेल्या योजना याचा प्रचार प्रसार व विधानसभा क्षेत्रात पक्ष संघटना मजबूत करून येणाऱ्या लोकसभा निवडणुका व विधानसभा निवडणूक यामध्ये पक्षाला बळकटी मिळवून देण्यासाठी विधानसभा निवडणूक प्रमुखांचे मुख्य जबाबदारी असणार आहे. ॲड. नकुल दादा देशमुख यांचा रिसोड विधानसभा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असून ते कायम जनतेच्या सानिध्यात असतात. पंतप्रधान नरेंद्र जी मोदी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे कार्य व विकास कामे ते सातत्याने लोकांच्या सानिध्यात असताना जनतेत पोहोचवतात युवकांमध्ये त्यांची मजबूत पकड असून सतत लोकांच्या समस्या आहे जनसंपर्क कार्यालयात वेळ देऊन सोडविण्यास त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. त्यांच्या या कार्याचा वेग बघता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात रिसोड विधानसभा निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी ॲड. नकुल देशमुख यांना दिली आहे त्यांचा दांडगा जनसंपर्क युवकात असलेली मजबूत पकड व सातत्याने गोरगरिबांची कामे करण्यासाठी त्यांचा असलेला प्रयत्न याचा रिसोड विधानसभा क्षेत्रात पक्ष बळकटीसाठी या निवडीमुळे फायदा होणार असून पक्ष संघटन मजबूत होण्यास मदत होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post