साई आश्रय सेवा मंडळ मांडा टिटवाला गुरुपौर्णिमेनिमित्त मांडा टिटवाळा ते शिर्डी भव्य पदयात्रा व पालखी सोहळा





बदलापूर प्रतिनिधी -नितीन बोराडे


टिटवाळा-  येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा   साई आश्रय सेवा मंडळ मांडा टिटवाला गुरुपौर्णिमेनिमित्त मांडा टिटवाळा ते शिर्डी भव्य पदयात्रा व पालखी सोहळ्यात अतिशय आनंदाने उत्साहाने युवकांचा सहवास अनेक लोक उपयोगी उपक्रम योग्य नियोजन  राम भोईर यांच्या मार्गदर्शना खाली गेली 21 वर्ष



 पदयात्रा शेकडो भाविकांच्या पदयात्रेनी सालाबाद प्रमाणे याही वर्षी अतिशय उत्साह आनंदात साजरी होत आहे सकाळी आरती चहा नाश्ता पदयात्रांसाठी रस्त्याच्या मध्ये मध्ये ठिकाणी पाणी दुपारी जेवण संध्याकाळी चहा नाष्टा पुन्हा संध्याकाळी



 आरती झाल्यावर जेवण असं उत्तम नियोजन या कार्यक्रमाला लोकन्यांचे सहसंपादक नितीन बोराडे हे देखील दरवर्षीप्रमाणे स्वतः पायी चालत वारी पूर्ण करतात नितीन बोराडे यांच्याकडून पदयात्रे यांना चॉकलेट बिस्किट तसेच रस्त्यामध्ये मिळणारे गोरगरीब विद्यार्थी मुलं वृद्ध यांना देखील चॉकलेट बिस्कीट



 हजारो लोकांना सेवा करण्याची संधी या ठिकाणी उपस्थित होते तसेच नाना ग्रुपचे अध्यक्ष वसंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नाना ग्रुप आज पालखीचा मान म्हणून पदयात्रा ३० ते ३५ किलोमीटर चालत आणली व रस्त्यामध्ये येताना नारायण सेवा मुलांना खाऊ वाटप असे अनेक उपक्रम या ठिकाणी साजरा करण्यात आले त्या निमित्ताने साईबाबांच्या आशीर्वादाने भरपूर पाऊस पडू दे बळीराजा सुखात राहू दे सर्वांची इडा पिडा जाऊ दे आणि सर्वांना सुख शांती लाभू दे ही साईबाबा चरणी प्रार्थना करत पदयात्रा पालखी सोहळा संपन्न झाली

Post a Comment

Previous Post Next Post