शिवकुमार घुगे मालेगाव मागील काहीवर्षा पासून बंद असलेली मालेगाव ते पांगराबंदी बस फेरी सुरु करण्यात यावी ही बस फेरी सुरु झाल्यावर मारसूळ गांगलवाडी पिंपळवाडी देवठाणा खांब येथील विध्यार्थी व प्रवाशी्यांना सोईचे होईल सध्यास्थितीत शासनाने जेष्ठ नागरिकांसाठी बस मध्ये फ्री प्रवास केला असून महिलांना बस भाड्यात 50% सवलत दिली आहें ग्रामीण भागात बस जात नसल्याने सदरहू लोक या योजनापासून वंचित राहत आहेत तसेच शालेय विध्यर्थ्यांना पांगराबंदी व मालेगाव येथे शालेय शिक्षणासाठी जावे लागते त्यांनाही एस टी महामंडळाकडून मासिक पास मध्ये सवलत दिली जाते परंतु या मार्गांवरील बससेवा बंद असल्याने या भागातील प्रवासी व विध्यर्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहें तरी समंधीतानी या बाबीवर त्वरित लक्ष्य देऊन मालेगाव ते पांगरा बंदी एसटी बस सेवा सुरु करावी अशी मागणी शिवराज हेल्थ क्लब चे अध्यक्ष अभय घुगे यांनी केली आहें
Tags
सामाजिक
