सांघिक जबाबदारीने यशाची अनेक शिखरे गाठता येतात ; सौ.अनिताताई रनाईक




वाशिम प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर


वाशिम ; दि . ८ जुलै , नवीन बदल घडत आहेत. नवीन राष्ट्रीय धोरण, त्यातील शिक्षणाचे नवे आव्हान असून खेड्यापाड्यातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचा विकास करणे महत्त्वाचे आहे, यूजीसी व नवे राष्ट्रीय धोरण यांच्या नव्या शैक्षणिक बदलाने अनेक नवी आव्हाने पदवी अभ्यासक्रमात उभी राहणार असून त्याचे नवे आव्हान आज वरिष्ठ महाविद्यालयासमोर  उभे राहणार आहे. मार्गदर्शन यावेळी सौ. अनिताताई सरनाईक  यांनी केले आहे.



त्यासाठी वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आपली जबाबदारी ओळखून आज शिक्षणाच्या नव्या धोरणात सामील होऊन खेड्यापाळ्यातील विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये नवे ज्ञान निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आजच्या आजच्या प्रगत युगामध्ये अनेक स्पर्धात्मक दृष्टिकोन असणे महत्त्वाचे आहे. म्हणून  समोरच आलेल्या आव्हानांचा मुकाबला करीत जगले की अनेक संधी त्यातून समोर येतात. आजचा काळ शैक्षणिक दृष्टीने महत्त्वाचा असून शिक्षणाच्या बाबतीत अनेक सकारात्मक बदल घडत असून अनेक नवी आव्हाने सुद्धा या नव्या शिक्षण धोरणाने आज  आपल्या समोर  उभी केली आहेत. त्यामुळे स्वामी विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे संधीचे सोने करायचे असेल तर संकटांचा मुकाबला करावा लागतो असे उदगार सौ अनिताताई सरनाईक यांनी काढले 

श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय याच्या वार्षिक नियोजनाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या .यावेळी व्यासपीठावर मार्गदर्शक प्राचार्य प्रा. डॉ. किशोर वाहने, समन्वयक व ज्येष्ठ प्रा. डॉ  संजय साळवीकर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. वार्षिक नियोजन व नवे शैक्षणिक धोरण आणि नाक महाविद्यालयासमोरील नवे आव्हान या NAAC च्या आढावा बैठकीत त्या बोलत होते .यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व नवीन सत्राचे नवे आयोजन करण्यासाठी या आढावा बैठकीचे आयोजन केलेले होते. महाविद्यालयाच्या समितीमध्ये सदस्य म्हणून असलेले प्रा. विजय वानखेडे यांचे यावेळी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यांनी NAAC मध्ये सुरू केलेल्या उत्कृष्ट कामाचा गौरव यावेळी करण्यात आला. तसेच प्रवेश प्रक्रिया व विद्यार्थ्यांसमोर आव्हाने यांचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी अनेक नवे प्रयोग राबवावे लागतील व त्यासाठी कर्मचाऱ्यांना मेहनत घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी शिस्त बद्ध कार्यक्रम आणि व्यवस्थापन आणि नियोजन यांचे बळावर हे संपूर्ण कार्य तुम्हाला पार पाडता येईल असे आवाहन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा  डॉ. गजानन हिवसे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा, गजानन बारड यांनी  केलें.  या कार्यक्रमाला महाविद्यालयाची सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post