वाशिम प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर
वाशिम ; महाराष्ट्रात सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणात जनतेला मूलभूत सुविधांपासून दूर ढकलले जात आहे, दुर्लक्षित केले जात आहे. केवळ सत्तेसाठी सुरू असलेल्या या राजकारणाचा संताप जनतेमध्ये दिसून येत असल्याचे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक सही संतापाची असे अभियान हिंदू जननायक मा राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने सुरू केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक मध्ये रविवारी दि ९ जुलै सकाळी ११ वाजतापासून सुरू झालेल्या या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी स्वयंस्फूर्त स्वाक्षऱ्या करून आपापले मनोगत नोंदवले.महाराष्ट्रात सध्या सुरू असलेली राजकीय उलथापालथ बद्दल तुम्हाला संताप येत नाही का, अशी कॉमेन्ट्स मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांनी केली. घानीरडया राजकारणाचा जनतेला वीट आलेला आहे. जनतेचा हा संताप जाहीर करण्यासाठी राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची सही मोहीम राबविण्यात येत आहे.वाशिम शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात रविवार सकाळी ११ वाजता पासून हे अभियान सुरू झाले. नागरिकांनी सकाळ पासूनच या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्या बदल सर्व जेनतेचे धंन्यवाद
तसेच यावेळी मनसे जिल्हा अध्यक्ष राजु पाटील किडसे व शहर अध्यक्ष रविभाऊ वानखेडे , मनविसे जिल्हा अध्यक्ष नितीन शिवलकर, यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यकम पार पडला तसेच उपस्थित मनविसे शहर सचिव निखिल बुरकुले, प्रसिदि प्रमुख शिवम घोडे, मनसे वाहतुक सेना चिटणीस फकिरा करडिले, मनसे वाहतुक सेना शहर अध्यक्ष उमेश टोलमारे, मनविसे शहर उपअध्यक्ष बाळु विभुते, मनसे ताउप अध्यक्ष चेतन जागरुत, मनसे सैनिक ओमभाऊ फड, मनसे सैनिक जुमा भाई बेनिवाले, निलेश गरदने व आदी मनसे सैनिक यांची उपस्थिती होती.
