वाशिम प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर
वाशिम ; आज वाशिम येथे मनसेचे राष्ट्रीय अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्या आवाहनानुसार संपर्क नेते विठ्ठल भाऊ लोखंडकर यांच्या मार्गदर्शनात आज ९ जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाशीम यांनी आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय गोंधळ तथा चिखल झाला आहे. नेत्यांनी मंत्र्यांनी मतदाराची फसवणूक केली आहे. या या करिता मनसेच्या माध्यमातून चित्ररथ करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मनीष डांगे यांच्या अध्यक्षतेत मनसेचे जनसंपर्क कार्यालय राजगर्जना येथून डफडे वाजवत शहर परिक्रमेला संतप्त नागरिकाच्या सह्या घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. चित्ररथ सिव्हिल लाईन, मार्गे बस स्थानक चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, येथे
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला हार अर्पण करून पाटणी चौक येथे अनेक संतप्त नागरिकांनी सह्या केल्या आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या पाटणी चौक ते श्रीराम टॉकीज मार्गे रिसोड नाका येथे सुद्धा नागरिकांनी प्रतिसाद देत संताप व्यक्त केला. कार्यक्रमाचा समारोप लाखाळा सोनखास रोड येथे करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन शहर संघटक प्रतीक कांबळे ,शहराध्यक्ष गणेश इंगोले यांनी केले. कार्यक्रमाला वाशिम तालुका संघटक रघुनाथ खूपसे ,वाशिम तालुका अध्यक्ष विठ्ठल राठोड, शहर उपाध्यक्ष राजू भालेराव, शाहरुख , उपाध्यक्ष विजय नाईकवाडे, चालक कैलासराव रौंदळे ,वाहतूक सेनेचे विनोद सावके, विद्यार्थी सेनेचे ता. अध्यक्ष यश चव्हाण व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. शहरात अनेकांनी चित्ररथासोबत आपल्या सह्या करून सेल्फी काढून संताप व्यक्त केला.

