मालेगाव : उमेश लहाने
उत्तम शिक्षण देण्याबरोबरच सुसंस्कारित नागरिक घडवण्याची जबाबदारी आपल्या विविध शिक्षण विभागातून यशस्वीरित्या पार पाडत असलेल्या श्री . व्यंकटेश सेवा समिती अंतर्गत नव्याने सुरू झालेल्या सीबीएससी पॅटर्नचे रामा इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल तसेच प्री प्रायमरी साठी क्युरियस किड्स या नवीन शाळेमध्ये आज पहिली पालक - शिक्षक सभा संपन्न झाली .श्री व्यंकटेश सेवा समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार अॅड विजयरावजी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली .सभेला मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ संजय रोडगे उपस्थित होते . ज्यांनी प्री प्रायमरी साठी क्युरिअस किड्स या नावाने स्वतंत्र अभ्यासक्रम तयार केला जो बालकामधील उपजत गुणांच्या परिपोषासाठी व त्यांच्यामधील कल्पकतेला , सर्जनशीलतेला योग्य वळण लावून भविष्यातील जागतिक स्पर्धेत आपला ठसा उमटवून वेगळी ओळख निर्माण करू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . तो अभ्यासक्रम राबविण्यासाठी त्यांनी रामा इंटरनॅशनल स्कूलच्या सर्व शिक्षकांना प्रशिक्षण दिले व यानंतर पालकांना अभ्यासक्रमाची रचना व उपयोगिता समजावून सांगण्यासाठी त्यांच्याशी सुसंवाद देखील साधला . यावेळी क्युरिअस किड्स सेलू मानवत येथील शाळेच्या मुख्याध्यापिका प्रगती क्षीरसागर ह्या देखील उपस्थित होत्या. सभेसाठी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते .
अॅड विजयरावजी जाधव यांनी सुद्धा रामा इंटरनॅशलन इंग्लीश स्कूल ही दर्जेदार व संस्कारक्षम शिक्षणाची सदैव कटिबद्ध राहिल असा विश्वास व्यक्त केला . कार्यक्रमासाठी सुशीलाताई माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत जोशी रामा इंटरनॅशनल स्कूलच्या दुर्गा कढणे ,अमित जयस्वाल ,विजय गजभार ,सुनिता बोडखे ,हरिदास मुळे ,राम गोटे ,रश्मी गाभणे ,रितिका गायकवाड ,निशा पवार , रेखा अग्रवाल , किरण देशमुख व तसेच शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे सहकार्य लाभले .
