अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केल्याबद्दल वाशिम येथे भाजप व अजितदादा समर्थक यांच्या वतीने जल्लोष




वाशिम प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर


वाशिम - राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी २ जुलै रोजी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राजभवनात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांना पद आणि गोपीनयतेची शपथ घेतली. त्यांच्या सोबतीला असलेले  छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील. हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. आज एकूण 9 आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. या सर्वांना विविध पदाचा पदभार त्यांच्याकडे सोपवला जाणार आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजितदादा पवार यांची महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल  व शपथग्रहण समारोहानंतर अजितदादा पवार समर्थक आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकार्‍यांच्या वतीने शनिवार,२ जुलै रोजी स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौका वाशिम  येथे फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. यावेळी गोविंद वर्मा, धनंजय हेन्द्रे, मुकेश ठाकुर, संतोष वानखेडे, राहुल तुपसांडे, राम इंगळे, राम ठेंगडे, गणेश खंडाळकर, गिरिष शर्मा, कपिल सारडा, आशुतोष निरखी, राजु वर्मा, राजु कलवार, अनिल रंधवे, अनिल तापड़िया, दिलीप अरगडे, प्रकाश भावसार, पवन फुटाणे, प्रशांत मुळे, हेमंत तिवारी, अंकित वर्मा, मजहर चाचा, नदीम भाई, मुन्ना बोरा यांच्यासह अजितदादा समर्थक व भारतीय जनता पार्टी पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहूसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post