गुरुपौर्णिमेनिमित्त वृक्षदिंडी व अभंग स्पर्धेचे आयोजन





मालेगाव :उमेश लहाने 




स्थानिक  सुशीलाताई जाधव विद्यानिकेतन मध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त वृक्षदिंडी व अभंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती भाकरे प्रमुख पाहुणे गजानन महाराज गोरे व तुकाराम महाराज गोरे उपस्थित होते.कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख मान्यवरांनी वृक्षदिंडीला हिरवी झेंडे दाखवून दिंडीला सुरुवात करण्यात आली विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेषेमध्ये येऊन व प्रत्येक विद्यार्थ्याने वेगवेगळ्या वृक्षांची रोपे सोबत घेऊन लाखाळा परिसरामध्ये त्या वृक्षांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर शाळेमध्ये अभंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन आणि हारअर्पण करण्यात आले. त्यानंतर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या अभंगाचे सादरीकरण केले. स्पर्धेत 23 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता .तसेच प्रमुख पाहुणे गोरे महाराज यांनी विद्यार्थ्यांना मानवी जीवनामध्ये अध्यात्माचे महत्त्व व अभंगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजून सांगून अभंगाचे गायन केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मुख्याध्यापिका ज्योती भाकरे शिक्षक अशोक ढोके,हीप्पी भीसडे, अनिल गोरे, राधेश्याम गवळी, रघुनाथ करवते,सागर जाधव, राधा साबळे ,जया आरु, किरण करणे ,गायत्री देशमुख शिक्षकेतर कर्मचारी गजानन कव्हर,शोभा पाचरे, देवकते ताई यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post