रिसोड ता 14
रुपेश बाजड
रिसोड तालुक्यातील कोयाळी जाधव ते डोणगाव सीमेपर्यंत मुख्यमंत्री ग्राम सडक योजना कार्यालय वाशिम या कार्यालयांतर्गत रस्त्याचे काम हे जवळजवळ दीड-दोन वर्षांपासून चालू आहे, हे काम प्रशासनाने वेळीच पूर्ण करणे अपेक्षित होते, परंतु प्रशासनाने याची चालढकल केली व दिनांक 14/ 7/2023 रोजी नेतंसा येथील शेतकरी श्री, संतोष बाजड हे त्या रोडून येत असताना त्या रोडवरील तात्पुरत्या स्वरूपाचा पूल हा खचून गेला, व जीव जाता- जाता शेतकरी श्री,संतोष बाजड यांचा वाचला परंतु गाडी पलटली झाली, व बैलांना मोठी इजा त्या घटनेमध्ये झाली, नव्हे तर बैलांवरच तो फुल कोसळला बैल त्या पुलाखाली अडकले अखेर गावकऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या मदतीने त्या बैलांना त्या पुलाखालून मोकळे करण्यात आले, परंतु यामध्ये बैलांच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे, खरंतर त्या शिवारातील शेतीकडे जाणारा हा एकमेव रस्ता शेतकऱ्यांचा आहे, ज्या शेतकऱ्यांची शेती ही त्या शिवारामध्ये आहे, त्या शेतकऱ्यांना याच रस्त्याने ये-जा करावी लागत आहे, या रस्त्या करिता प्रशासन योग्य पावला उचलत आहे, परंतु प्रशासनाची देखील व संबंधित अधिकारी यांची देखील जबाबदारी आहे, की असा अनुचित प्रकार घडू नये, तरी सुद्धा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या कार्यालयांतर्गत चालू असलेला हा रस्ता अतिशय निकृष्ट व ढिसाळ दर्जाचा आहे, वेळीच प्रशासनाने याची दखल घेऊन संबंधित दोशी यांचे वर कार्यवाही न केल्यास गावकऱ्यांच्या वतीने योग्य ते टोकाचे पाऊल संबंधित जबाबदार अधिकारी यांचे संदर्भात उचलावे लागेल, व शेतकरी श्री, संतोष बाजड यांच्या बैलाला झालेली दुखापत ही अतिशय संताप जनक घटना आहे, तरी प्रशासनाने याचे खरे खोटे करावे,
-
मुख्यमंत्री ग्राम, सडक, योजना, कार्यालयातील अधिकारी यांचे हलगर्जीपणा मुळे शेतकऱ्यांना जिव धोक्यात गळून ये-जा करावी लागत आहे, संबंधितावर कार्यवाही करावी, व शेतकरी संतोष बाजड यांना आर्थिक मदत घ्यावी,,
श्री,विष्णू बाजड
अध्यक्ष कास्तकार फाऊंडेशन,
