विजय शेंडगे प्रतिनिधी
लघु सिंचन विभागामार्फत गेल्या दोन वर्षांमध्ये कोटी रुपयाचे कामे मालेगाव तालुक्यात झालेली आहेत सिमेंट नाला बांधकाम, नाला खोलीकरण व रुंदीकरण, तलाव दुरुस्ती करणे पाझर तलावाचे साठवंतलामध्ये रूपांतर करण्याची कामे ,कोल्हापुरी बंदराला गेट टाकून अडवणे, कोल्हापूर बंदराची दुरुस्ती इत्यादी अनेक कामे लघु सिंचन विभागामार्फत करण्यात आलेली आहे परंतु या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे काही कमी अर्धवट असताना उप अभियंता व कनिष्ठ अभियंता लघु सिंचन शाखा मालेगाव यांनी ठेकेदारासोबत संगणमत करून शासनाच्या रकमेवर डल्ला मारण्याचे काम केलेला आहे तरी ठेकेदार व उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची ताबडतोब चौकशी करून यांच्यावर त्वरित कारवाई करावी व शासनाचा जो निधी ठेकेदार व अभियंता यांनी हडपला तो व्याजासहित वसूल करावा अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदन देतेवेळी शिवसेना तालुकाप्रमुख उद्धव पाटील गोडे भगवानराव बोरकर गजाननराव बोरचाटे त्यांनी दिला
