समाजकार्य अभ्यासक्रम काळाची गरज ; प्रा. डॉ संजय साळीवकर




वाशिम तालुका प्रतिनिधी  ; १४ जुलै, ओव्यात फार वेगळा परिवर्तन होत आहे. आधुनिकीकरण आणि औद्योगीकरणामुळे समाज जीवनात फार मोठा प्रमाणात  स्थलांतरित होत आहेत त्यामुळे विभक्त कुटुंब , कौटुंबिक अत्याचार, व्यसनाधीनता,‍ बेरोजगारी, प्रेम प्रकरणातून युवकांच्या हत्या, इत्यादी होत असलेल्या समस्येमुळे घटनेमुळे  समाज व्यवस्था ही खिळखिळ झाली आहे . समाजातील समस्या वाढत्या त्याच सोबत पर्यावरण प्रदूषण ,आरोग्य विषयक समस्या व इतर नियंत्रणाच्या बाहेर गेल्या आहेत .परंतु अशा समस्येवर मात करण्याकरिता समुपदेशनाची खरी गरज आहे . आणि ही गरज समाजात कार्य अभ्यासक्रमाच्या माध्यमातून पूर्ण केले जाते. शिक्षणामध्ये विविध अभ्यासक्रम आहेत परंतु समाजकार्य अभ्यासक्रम समाजातील समस्या निर्मूलन करण्याकरिता एक शास्त्रीय ज्ञानाचा आणि पद्धतीचा आधारे वापर या समाजकार्य अभ्यासक्रमातून करता येतो. समाजकार्यातील बी एस डब्ल्यू व एम एस डब्ल्यू अभ्यासक्रमातून समाजकार्य  शिकविल्या जाते. आज मनुष्य कितीही प्रगतशील झाला तरी त्याला समूह जीवन आणि समाजाची आवश्यकता आहे. परंतु  इलेक्ट्रॉनिक माध्यामा मुळे आपण एकांतात जगत आहोत. ही एक शोकांतिका आहे...!

यावर मात करण्याकरिता हा bsw व msw अभ्यासक्रम श्री.रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय वाशिम येथे शिकविला जात आहे. बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाकडे प्रवेश घेण्याची आव्हान यावेळी श्री. रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय येथील प्रा. डॉ. संजय साळीवकर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती  समाजकार्य विभाग अभ्यास मंडळाचे अध्यक्ष  यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post