प्रतिनिधी रुपेश बाजड
रिसोड ता.19
महिला उत्कर्ष प्रतिष्ठान द्वारा संचालित आयुर्वेद कॉलेज , हॉस्पिटल व रिसर्च सेंटर पुंडलिक नगर देगाव ता. रिसोड जि. वाशीम यांच्या वतीने स्पार्टन 2017 या वर्षीच्या विद्यार्थ्यांकडून खा.मा. भावनाताई गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड येथील बालाजी रिसॉर्ट येथे दिनांक 17 जुलै 2017 रोजी बीएएमएस(आयुर्वेदाचार्य)या पदवी विषयाचा पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे देखणे सूत्रसंचालन महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी आणि नामवंत निवेदक चाफेश्वर गांगवे यांनी केले.या पर्वावर स्पार्टन बॅचच्या वतीने चाफेश्वर गांगवे यांच्या शब्द सामर्थ्याचा सन्मान म्हणून त्यांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित केले.चाफेश्वर गांगवे यांनी अद्याप पर्यंत महाराष्ट्रात अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे.यावेळी समारंभाच्या अध्यक्षस्थानी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या संचालिका मा.साधनाताई गवळी ह्या होत्या तर उद्घाटक म्हणून रिसोड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रा.विजयमालाताई आसनकर ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. शिवचंद्र गुरमे ,डॉ.अमोल नरवाडे,डॉ.हेमंत नरवाडे ,डॉ. नंदकिशोर रंजवे, डॉ.निलेश गोरे, डॉ.कल्पना आरु,डॉ.अलका म्हात्रे,डॉ.दीपक पवार,डॉ. प्रतिभा ढोणे,श्री विश्वबंधू हिंगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
