मालेगाव : उमेश लहाने
जिल्ह्यातील वाशिम, रिसोड व मालेगाव तहसील कार्यालया अंतर्गत कार्यक्षेत्राकरिता उपविभागीय अधिकारी यांच्याअध्यक्षतेखाली
कोतवाल पदभरती २०२३ ची प्रक्रिया सुरू आहे. या पदभरती करिता कोणीही आर्थिक देवाणघेवाण करू नये असे आवाहन वाशिम उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनी केले आहे. वाशिम उपविभागीय कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या वाशिम,रिसोड व मालेगाव कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गावातील रिक्त असलेल्या कोतवाल पदाची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
२०२३ कोतवाल पदभरती प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शक पद्धतीने करण्यात येत आहे. कोतवाल पदभरती संदर्भात कोणत्याही अपप्रचाराला बळी पडून कोणीही कुणाशी कोणत्याही प्रकारची आर्थिक देवाण घेवाण करू नये. तसेच कोतवाल पदभरती प्रक्रिये बाबत अपप्रचार करणाऱ्या व्यक्तींचे समर्थन करू नये. जिल्ह्यातील वाशिम उपविभागातील वाशिम, रिसोड व मालेगाव तालुक्यातील कोतवाल पद भरती ची प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणे पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन वाशिम उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनी एका पत्रका द्वारे केले आहे.