वाशिम चा कला पथकाचे पंढरीच्या वारीत केले कौतुक
( वाशिम प्रतिनिधी ; वाशिमच्या रामचंद्र बहुददेशीय जनजागृती कला व सांस्कृतिक संस्था सावंगा जहागीर यांचा कला पथकाच्या वतीने पुणे ते पंढरपूर आळंदी ते पंढरपूर पंढरी वारीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या योजनेचा प्रसार व प्रचार होण्यासाठी या हेतूने पंढरीची वारी शासन आपल्या दारी या युक्तीप्रमाणे वारीमध्ये जनजागृतीपर जागर करण्यात आला. )
वाशिम प्रतिनिधी ; प्रदिप पट्टेबहादुर
; देहु आळंदी व पुणे ते पंढरपुर संत ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळा मार्गावरच्या दोन्ही ही दिंडी पालखी सोहळ्यात महाराष्ट्र शासणाच्या वतीने वारकऱ्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती मिळावी व जनतेत महाराष्ट्र शासनाच्या योजनांचा प्रसार व प्रचार होण्याच्या हेतुने पंढरीची वारी शासन आपल्या दारी या युक्तिप्रमाणे महाराष्ट्राचे प्राख्यात शाहीर सुभाष गोरे सांगोलाकर यांच्या नेतृत्वात आणी, आदरनिय अधिकारी शार्दुल साहेब ,आदरनिय अधिकारी श्रीकांत साहेब यांचे मुख्य मार्गदर्शनात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लोकशाहीर लोककवी मधुकर उर्फ कविनंद गायकवाड आणि महाराष्ट्रातील नामवंत कलापथक गृप,शाहीर केशव डाखोरे ,शाहिरा वनिता डाखोरे
वाशिम.शाहीर प्रकाश दांडेकर हिंगोली.शाहीर भारत मुंजे परभणी चारठाणेकर. शाहीर भिमराव तायडे.व शाहीर संतोष दिमोधरे अकोला.यांनी शासकीय चित्र रथाद्वारे दिंनाक १२ जुन २०२३ ते ०१ / जुलै २०२३ पर्यंत जनजागृती करण्यात आली.जनजागृती कलापथकाना वारक-याचा भरघोस प्रतिसाद मिळत होता.वारी मधील जनजागृती कलापथक कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता लोककलावंताचे आधार स्तंभ आदरनिय शाहीर सुभाष गोरे साहेब आदरनिय युवा कलावंत विक्रम गोरे आदरनिय सोनु गोरे , चित्र रथावरील आदरनिय सर्व चित्ररथचालक कॅमेरा मॅन ज्यांच्या भरोशावर ही यंत्रणा चालत होती ते सर्व सन्माननीय मॅनेजर साहेब या सर्वांनी परिश्रम घेतले. या वारी मध्ये रामचंद्र जनजागृती कला व सांस्कृतिक संस्था सावंगा जहागीर तालुका वाशिम येथील सहभागी कलावंत प्रसिद्ध गायीका सुशीला घुगे, गायक पंढरी घुगे गायिका विश्रांती गायकवाड वाशिम,रंजनाबिई इंगोले, अशोक इंगोले ,जनार्दन इंगोले , तामसाळा, ढोलकीवादक सुनिल सावळे येवती, होर्मो वादक,सावरगाव जिरे, सुमणबाई पडघाण आडोळी ,या सर्व वरिल कलावंतानी भाग घेतला होता.असे लोकशाहीर अण्णा गायकवाड यांनी कळविले आहे.
