वाशिम ; जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात मसला पेन इथे राहत असलेले ग्रामस्थ पांडुरंग देशमुख यांच्या घरामध्ये रात्री ३;१५ वाजताच्या सुमारास साप आढळून आल्याने एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी सर्पमित्र सुमित तायडे यांना फोन करून त्या ठिकाणी प्राचारण करण्यात आले . यावेळी सर्पमित्र सुमित तायडे यांनी या इंडियन कोब्रा भारतीय नाग सापाला मोठ्या सीताफिने पकडले. सुमित तायडे यांनी सांगितले की हा भारतातील सर्वत्र आढळणारा सर्वात विषारी भारतीय नाग जातीचा साप आहे. या सापाची लांबी 5.7 फुट इतकी असून याला इंग्लिश मध्ये कोब्रा तर मराठीमध्ये भारतीय नाग म्हणून ओळखले जाते. यावेळी सुमित तायडे यांनी या सापाला पकडून सर्पतज्ञ डॉ.संजय नाकाडे,सर्पतज्ञ डॉ.श्रीधर कंदी, अनुभवी सर्पमित्र विजयराज पाटील, सहकारी सर्पमित्र गोपाल बोरचाटे, सर्पमित्र पर्यावरण प्रेमी प्रदिप पट्टेबहादुर, मार्गदर्शक व रिसोड वनविभाग अधिकारी साठे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या सापाला वनामध्ये सोडण्यात आले.
घ्यावयाची काळजी -
सर्पदंश झाल्यास तातडीने काय करायला हवे?
सर्पदंश झाल्यानंतर घाबरू नये. दवंशाच्या वर दोरी किंवा पट्टी बांधावी. जडीबुटीवर विश्वास ठेवून उपचार करू नयेत. शक्य तितक्या लवकर जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी तातडीने न्यायला हवे.
हे जरूर लक्षात ठेवा
परिसर स्वच्छ ठेवा, अनावश्यक झुडपे वेली काढून टाका. ड्रेनेज पाइपच्या गटाराकडील बाजूला जाळी बसवा. खळ्यात, गोठ्यात, शेतात वावरताना लांब काठी बाळगा. रात्री जमिनीवर झोपणे टाळा. रात्री बाहेर जाताना, शेतात वावरताना हातात टॉर्च, पायात बूट घालायला विसरू नका.
*उपचार योग्य वेळी करावे
#साप चावला म्हणजे मृत्यू नाही. प्रत्येक साप विषारी नसतो. सर्पदश झाला तरी योग्य वेळेत योग्य वैद्यकीय उपचार केले तर रुग्ण वाचतो. साप घरात शिरू नये यासाठी उपाय करावे.
सर्पमित्र सुमित तायडे 9529243679

